जिल्हा परभणी

परिचय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.

संस्थेबद्दल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., जिल्हा परभणी ही संस्था महाराष्ट्र सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असून परभणी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी समर्पितपणे कार्यरत आहे.

सदस्य हित, पारदर्शक कारभार आणि शैक्षणिक-सामाजिक बांधिलकी जपत कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी एक समर्पित सहकारी आर्थिक केंद्र म्हणून संस्था कार्यरत आहे.

संस्थेची स्थापना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने झाली असून आज संस्थेचा एनपीए (थकीत कर्ज) ०% आहे, जे संस्थेच्या शिस्तबद्ध कारभाराचे प्रतीक आहे.

📍 अंभोरे कॉम्प्लेक्स, राष्ट्रवादी भवनच्या समोर, खानापूर फाटा वसमत रोड, परभणी. ता.जि.परभणी.

आपल्या पत संस्थेची वैशिष्ट्ये

  • सर्वात कमी व्याज दराने कर्ज देणारी परभणी जिल्हयातील एकमेव पत संस्था.
  • पगारदार, शासकिय, निमशासकीय, अधिकारी, कर्मचारी यांची परभणी जिल्हा मर्यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची एकमेव पतसंस्था.
  • सदस्यांना त्वरित व सुलभ कर्ज पुरवठा करणारी पतसंस्था.
  • पारदर्शक कारभार व सहकारी मूल्ये जपणारी पतसंस्था.
  • गुणवंत विद्यार्थ्यांच्या विकासाच्या शैक्षणिक योजना राबविणारी पतसंस्था.
  • गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणारी एकमेव पतसंस्था.
  • शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांना हक्क व अधिकार देणारी पतसंस्था.
संपर्क करा (WhatsApp)